वाढदिवस साजरा कधी व कसा करावा ?
11:39 // 0 comments // Dainik // Category: //वाढदिवस तिथीनुसार साजरा करण्याचे महत्त्व
आपण वाढदिवस तिथीनुसार साजरा करायला सांगतो. ज्योतिष-शास्त्रामध्ये `ज्या दिवशी आपला जन्म झाला, त्या तिथीला कोणतेही शुभ कर्म करू नये; कारण ती घाततिथी असते', असे सांगितले आहे. मग त्या दिवशी नेमके काय करावे ?
एक विद्वान : `घाततिथी' म्हणण्यातील गर्भितार्थ वेगळा आहे. त्या त्या तिथीला जन्मलेल्या जिवाची स्पंदने त्या त्या तिथीशी मिळतीजुळती असल्याने करणी करणारे मांत्रिक त्या त्या तिथीला त्या जिवाच्या प्रतिकृतीवर विधी करून त्या जिवाला ७० टक्के एवढ्या प्रमाणात त्रास देऊ शकतात; म्हणून त्या तिथीला `घाततिथी', म्हणजेच `सर्वांत जास्त त्रास देता येण्याची शक्यता असलेली तिथी', असे संबोधले जाते.
कलीयुगात अर्थाचा अनर्थ होण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. त्या दिवशी घात होण्याची शक्यता, म्हणजेच शुभ कर्मात बाधा येण्याची शक्यता असल्याने `त्या जिवाशी संबंधित कोणतेही शुभ कर्म करू नये', असा अर्थ यातून काढला गेल्याने वरीलप्रमाणे चुकीचा समज रूढ झाला आहे. या दिवशी शुभ कर्म, म्हणजेच वाढदिवस करतांना औक्षणातून कुलदेवतेला केलेल्या प्रार्थनेतून चैतन्याची फलप्राप्ती करून घेऊन त्या त्या स्तरावर होणार्या हल्ल्यांना प्रतिकार करण्याचे बळ जिवाला प्राप्त होते. म्हणून `या दिवशी कोणतेही शुभ कर्म करू नये', असा संकेत नाही. ते एक अभ्यासहीन वक्तव्य आहे.' (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ४.३.२००६, सायं. ७.१७)
कौटुंबिक धार्मिक कृतींमागील शास्त्र
वाढदिवस म्हणजे जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे मूल्यमापन करण्याचा दिवस`वाढदिवस म्हणजे जिवाची आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती होणे. आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती होण्यासाठी जिवाच्या सूक्ष्म-देहांची शुद्धी होऊन त्यांना पूरक असे देवतांचे त्रिगुणात्मक तत्त्व योग्य त्या प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. आध्यात्मिक उन्नतीचेच दुसरे नाव `वृद्धी' किंवा `वाढ' असे आहे. जिवाच्या निर्मितीपासून त्याच्या आध्यात्मिक उन्नतीला सुरुवात होते. जीव प्रत्यक्षात साधना करत नसला, तरी त्याच्यावर केलेल्या संस्कारांमुळे त्याच्यातील सात्त्विकता वाढून त्याच्या आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो. `जिवावर केलेला संस्कार त्याच्या सूक्ष्म-देहांवर रुजला का', याचा आढावा घ्यायचा दिवस म्हणजे वाढदिवस अध्यात्मदृष्ट्या वाढदिवस म्हणजे स्वत:च्या आध्यात्मिक उन्नतीचे मूल्यमापन करण्याचा दिवस. आध्यात्मिक उन्नती झाल्यास तोच खरा वाढदिवस ठरतो.' - ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १३.५.२००५, रात्री ८.०४ ते ८.२२)
सत्ययुगातील जिवांचा वाढदिवस
`कोणताही जीव जन्माला येतांना गतजन्मीची आध्यात्मिक पातळी सोबत घेऊन येतो. त्यानुसार त्याच्या कुंडलिनीतील आवश्यक ते चक्र जागृत असते किंवा त्या चक्रापर्यंत त्याच्या कुंडलिनीचा प्रवास होेऊन थांबलेला असतो. सत्य, त्रेता व द्वापार या युगांत जिवाचा पहिला वाढदिवस साजरा करतांना त्याला आशीर्वाद देण्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत येत असत किंवा जिवाला आशीर्वाद मिळण्यासाठी उन्नतांकडे नेले जात असे. उन्नत जिवाचे औक्षण करून व जिवासाठी अव्यक्त संकल्प करून त्याच्या शरीराच्या विविध अवयवांवर अक्षता टाकून त्या त्या ठिकाणी असलेले चक्र जागृत करीत व ज्या चक्रापर्यंत जिवाची उन्नती झालेली असेल, त्याच्या पुढच्या चक्राला आपल्या हाताच्या बोटांत अक्षता घेऊन बोटांनी स्पर्श करीत. त्यामुळे जिवाच्या कुंडलिनीचा पुढील प्रवास सुरू होत असे. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पातळीच्या उन्नतांना कोणत्याही जिवाकडे पाहिल्यावर `त्याची आध्यात्मिक उन्नती कोणत्या चक्रापर्यंत झालेली आहे', हे लक्षात येत असे. त्यामुळे त्यांनी केवळ त्या चक्रावर नजर टाकली, तरीही जिवाची उन्नती होत असे.' - ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १३.५.२००५, रात्री ८.०४ ते ८.२२)
वाढदिवस म्हणजे चैतन्य ग्रहण करण्याच्या क्षमतेत वृद्धी करण्याचा दिवस
`वाढदिवस म्हणजे जिवाच्या चैतन्य ग्रहण करण्याच्या क्षमतेत देवतांच्या आवाहनात्मक आशीर्वादातून प्राप्त होणार्या लहरींद्वारे वृद्धी करणे. या चैतन्यात्मक प्रक्रियेतून सात्त्विक झालेल्या बाह्य वायूमंडलाला पूरक बनून जीव आंतरिक स्थिरता प्राप्त करून घेतो.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २८.८.२००५, सकाळी ११.४०)
(संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `धार्मिक व सामाजिक कृतींमागील शास्त्र')
अधिक अध्यात्मशास्त्रीय माहिती साठी येथे टिचकी मारा
Related posts :
0 comments for this post
Most Viewed
- 2008 - 2009 SimplexDesign. Content in my blog is licensed under a Creative Commons License.
- SimplexPro template designed by Simplex Design.
- Powered by Blogger.com.
This template is brought to you by : allblogtools.com | Blogger Templates