गुढी कशी उभारावी ?
06:10 // 0 comments // Dainik // Category: //
१. गुढी सूर्योदयानंतर लगेचच उभारायची असते.
२. मोठ्या वेळूच्या (कळकाच्या) उंच टोकास हिरव्या किंवा पिवळया रंगाचा भरजरी खण बांधतात. त्यावर साखरेच्या गाठी, कडुनिंबाची कोवळी पाने, आंब्याची डहाळी व लाल फुलांचा हार बांधून वर चांदीचा किंवा तांब्याचा कलश यांनी सजवून गुढी उभी केली जाते. गुढी उभी करतांना ती मुख्य दरवाजाच्या बाहेर परंतु उंबरठ्यालगत उजव्या बाजूला (घरातून पाहिल्यास) जमिनीवर उभी करावी. ती उभी करतांना तिची स्वस्तिकावर स्थापना करावी. गुढी अगदी सरळ उभी न करता थोडीशी कललेल्या स्थितीत उभी करावी. गुढीपुढे सुंदर रांगोळी घालावी.
३. गुढीची `ब्रह्मध्वजाय नम: ।', असे म्हणून संकल्पपूर्वक पूजा करावी.
४. सूर्यास्ताच्या वेळी गुळाचा नैवेद्य दाखवून गुढी उतरवावी.
अधिक अध्यात्मशास्त्रीय माहिती साठी येथे टिचकी मारा (Marathi)
अधिक अध्यात्मशास्त्रीय माहिती साठी येथे टिचकी मारा (English)
Related posts :
0 comments for this post
Most Viewed
- 2008 - 2009 SimplexDesign. Content in my blog is licensed under a Creative Commons License.
- SimplexPro template designed by Simplex Design.
- Powered by Blogger.com.
This template is brought to you by : allblogtools.com | Blogger Templates