दीपप्रज्वलन मेणबत्तीने नव्हे, तर तेलाच्या दिव्याने (कयपंजीने) का करावे ?
10:20 // 0 comments // Dainik // Category: //
व्यासपिठावर दीपप्रज्वलन करण्याच्या संदर्भातील कृतींचे शास्त्र
मेणबत्तीतून प्रक्षेपित होणार्या लहरी या तम-रजयुक्त असतात. या लहरींमुळे वातावरण तामसिक बनते. तसेच या लहरींची गती अनियमित व वेगवान असल्याने यांतील तम-रजोकणांचे घर्षण होऊन त्यातून उत्पन्न होणार्या उष्ण वायूमुळे वातावरणातील सत्त्वकणांचे विघटन होते. त्यामुळे वातावरणातील सात्त्विकता नष्ट होते. मेणबत्तीने दीपप्रज्वलन केल्यामुळे समईभोवती तमोकणांचे मंडल तयार होते. त्यामुळे समईच्या ज्योतीकडे आकृष्ट होणार्या ब्रह्मांडातील देवतेच्या क्रियालहरींना अडथळा प्राप्त होतो. याउलट तेल हे रजोगुणाचे प्रतीक आहे. तेलाची ज्योत ही ब्रह्मांडातील देवतेच्या क्रियालहरींना जागृत करण्यास मदत करते; म्हणून दीपप्रज्वलनासाठी तेलाचा दिवा (कयपंजी) वापरणे इष्ट ठरते.
संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगतो ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `धार्मिक व सामाजिक कृतींमागील शास्त्र')
अधिक अध्यात्मशास्त्रीय माहिती साठी येथे टिचकी मारा
Related posts :
0 comments for this post
Most Viewed
- 2008 - 2009 SimplexDesign. Content in my blog is licensed under a Creative Commons License.
- SimplexPro template designed by Simplex Design.
- Powered by Blogger.com.
This template is brought to you by : allblogtools.com | Blogger Templates